स्कीमचे आमिष दाखवत दुकानदाराने कागदपत्र गोळा करत ग्राहकांच्या नावे कर्ज काढत घातला गंडा
डोंबिवली दि.०३ – एक किंवा दोन सभासद झाल्या नंतर दहा हजार रुपये भरल्यानंतर एसी तुमचा अशा खोट्या स्कीमचे आमिष दाखवून एका दुकानदाराने ग्राहकांना गंडा घातल्याची घटना डोंबिवली मध्ये उघडकीस आली आहे .या प्रकरणी दत्तात्रय शेडगे या फसवणूक झालेल्या ग्राहकाने डोंबिवली पोलीस स्थानकात नंदकुमार चौगुले व दिवेश शहा विरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी नंदकुमार चौगुले व दिवेश शहा विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील गणेश इलेक्ट्रिकल या दुकानातील सेल्समन दिवेश शहा व मालक नंदकुमार चौगुले या दोघांनी दुकानात एक किंवा दोन सभासद झाल्यानंतर दहा हजार रुपये भरल्या नंतर एसी तुमचा या नावाने बनावट स्कीम काढत या स्कीम चे आमिष ठाणे खारेगाव येथे राहणारे दत्तात्रय शेडगे याना सात महिन्या पूर्वी दाखवले होते. तसेच शेडगे यांच्या सह अनेक ग्राहकांचे पणकार्ड ,आधारकार्ड ,रेशनिंग कार्ड लाईट बिल एक सही केलेला कोरा चेक तसेच एका फायनान्स कंपनीच्या फॉर्म वर सह्या घेतल्या या कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढत परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी हे पैसे वापरून ग्राहकाची फसवणूक केली .सदर बाब निदर्शनास आल्याने शेडगे यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार केली असता या तक्रारी नुसार पोलिसांनी दुकानातील सेल्समन दिवेश शहा व मालक नंदकुमार चौगुले या दोघांविरोधात गुन्हा दखल केला आहे.