सोसायटी च्या आवारात बियर पिन्यास मज्जाव केल्याने मद्यपीच्या टोळीने केली बेदम मारहाण

कल्याण दि.१४ – सोसायटीच्या आवारात बियर पिण्यास मज्जाव केल्याने सहा जणांच्या टोळीने दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्व पिसवली येथे घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात पप्पी गवळी ,मोनू ,केतन ,घाटे ,विशाल उर्फ छोट्या व त्यांच्या दोन साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पप्पी गवळी याच्या विरोधात याआधी ही मारहाणीचे गुन्हे दाखल असून त्याची या परिसरात त्यांची दहशत आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करत कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कल्याण पूर्वेकडील चेतना स्कूल जवळ पिसवली येथील विनायक रेसिडन्सी येथे बुधवारी रात्री च्या सुमारास याच परिसरात राहणारे पप्पी गवळी आणि मोनू हे दोघे बियर पीत होते ,यावेळी सोसायटी मधील रहिवासी सोबत यांनी त्यांना बियर पिण्यास मज्जाव केला. त्यामुळे संतापलेल्या पप्पी गवळी व त्याच्या पाच साथीदारांन सोबत यांना बेदम मारहाण केली. यावेळी सोबत यांना वाचवण्यासाठी गेलेल्या श्रावण पारधी यांना देखील या टोळीने शिवीगाळ करत ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली .या मारहाणीत दोघे जखमी झाले असून त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी पप्पी गवळी ,मोनू ,केतन ,घाटे ,विशाल उर्फ छोट्या व त्यांच्या दोन साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email