सोशल मिडीयावरून व्यावासाइकाला लाखोंचा गंडा
नाशिक-सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख काढून व्यवसाय करुन पैसे कमावायाची संधि दाखवत एका व्यावसायिकाला लाखोंचा गंडा घतल्याचा प्रकार नाशिक येथे घडला आहे.ब्रिटिनमधील आमच्या कंपनीसाठी औषधी बिया लागतात,त्या खरेदी करुन आम्हाला द्या आणि यातून नफ़ा मिळवा अशी बतावणी करत महिलेने व्यावसायिकाला बिया कुठून विकत घ्यायच्या व कंपनीपर्यंत कशा पोहोचवायच्या यासंदर्भात त्या व्यावसायिकाला सोशल मीडियाच्यावरच बिया विक्रेत्याशी संपर्क साधुन दिला.जून महिन्यापासून आतापर्यंत बँक खात्यात वारंवार पैसे भरुनही बिया मिळत नसल्याने सदर व्यावसाईक कमालीचा त्रस्त झाला.संबधितांकडून योग्य माहितीही मिळत नव्हती.आतापर्यंत ४१लाख ६४ हजार रूपये देवूनही घड़णा-या या प्रकारामुळे त्रस्त होवून अखेर त्याने याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली.याप्रकरणी सायबर पोलिस ठाणे तपास करत असून, आरोपी महिलेचा शोध सुरु आहे.या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे..