सोनापूरात विहीरीत आढळला तरूणीचा मृतदेह प्रियकराने हत्या केल्याचा आरोप , महिला आयोगाकडे तक्रार
गोंडपिपरी – येथील तालुक्यातील सोनापूर देशपांडे येथे १३ सप्टेंबरला विहीरीत तरूणीचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी विवाह करण्याची इच्छा नसल्याने प्रियकराने तिची हत्या केल्याचा आरोप मृतक तरूणीच्या भावाने केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीसांची भुमीका संदिग्ध आहे. यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देउन कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
सोनापूर देशपांडे येथील अनिता सुरेश ठोंबरे वय २० हिचे गावातीलच अक्षय धनंजय चौधरी या तरूणासोबत मागील तिन वर्षापासून प्रेमसंबध होते. प्रेमप्रकरण सुरू झाल्यानंतर अनिताने अक्षयकडे लग्नाची मागणी घातली होती. यावेळी अक्षयने लग्नाला हेाकार दिला होता. पण काही दिवसातच त्याने आपली भुमिका बदलली. या लग्नामुळे आपली बदनामी होणार, घराकडील मंडळी परवानगी देणार नसल्याचे सांगत त्याने लग्न करण्यास नकार दिला.
या संकटातून सुटण्यासाठी अक्षय आपल्या बहिणीला संपविण्याच्या प्रयत्नात होता. अशातच बारा सप्टेबर रोजी अक्षयने गावातील वनिता पुलगमकर यांच्या घरी भजन आहे. तु रात्री भजनाला ये असे अनिताला सांगितले. यानुसार भजनाला जात आहे असे सांगून ती रात्री नउ वाजता घरून निघाली. दुस-या दिवशी अनिता घरी परत आली नाही. यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. यानंतर मेश्राम यांच्या घराजवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहीरीच्या अॅगंलला अनीताची ओढणी बांधलेली होती. यानंतर गावकरी एकत्र आले. विहीरीत गळ टाकली असता अनीताचा मृतदेह विहीरीत आढळला. हा संपुर्ण प्रकार एकंदरित संशयास्पद असून बहिणीच्या विवाहाच्या मागणीला कंटाळून अक्षयने तिची हत्या केली असा आरोप मृतक तरूणीचा भाऊ सुभाष ठोंबरे यांनी केला. याप्रकराची तक्रार लाठी पोलीसाकडे करण्यात आली.पण या गंभीर प्रकरणी लाठी पोलीसांनी उदासिनता दाखविली. एवढेच नव्हे तर आपल्या बयानाला उलटे करून अनीताने आत्महत्या केल्याचा खोटा बयाना तयार करून त्यावर जबरजस्तीने सही घेतली असा आरोप सुभाष ठोंबरे यांनी केला आहे.
घटनेला पंधरा दिवस लोटूनही याप्रकरणी उचित कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे ठोंबरे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेउन त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्याकडे तक्रार करित याप्रकरणाची सविस्तर चैकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे. राज्य महिला आयोग, मानवाधिकार आयोग,पालकमंत्री यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.