सैनिकांच्या मुलांसाठी वसतिगृह प्रवेशाचे आवाहन

ठाणे दि.२५ – युद्ध विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी,माजी सैनिक व सेवारत सैनिकांच्या मुला/मुलींसाठी वसतिगृहमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

२०१७-२०१८ करिता इयत्ता १० वी ते पदव्युत्तर शिक्षण तसेच औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या युद्धविधवा पाल्य, माजी सैनिक विधवा पाल्य,माजी सैनिक व युद्धात जखमी झालेले माजी सैनिकांचे पाल्य व सेवारत सैनिक पाल्य व त्यांची पत्नी यांना प्रवेश देण्यात येणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०१८ आहे. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सर्व सोयीनी युक्त असे वसतिगृह ज्ञान साधना कॅालेज मागे,धर्मवीर नगर,नौपाडा ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे.

अधिक महितीसाठी ०२२-२५८३४८३० यावर संपर्क साधावा असे आवाहन मेजर प्रांजळ जाधव,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email