सेवा सहयोग फॉउंडेशनचे यंदा 1 लाख विद्यार्थ्यांना स्कुल किट देण्याचा संकल्प
ठाणे, ता. 17: नव्या शालेय वर्षात नवं दप्तर, नवं शालेय साहित्य वापरायला मिळणं ही आजही अनेक विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चैनीची गोष्ट आहे.
अशा 80 हजार विद्यार्थ्यांना मागील वर्षी सेवा सहयोग फौंडेशनतर्फे स्कुल किट देण्यात आले. यंदा 1 लाख विद्यार्थ्यांना स्कुल किट देण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
स्कुल किट मध्ये प्राथमिक वर्गांसाठी वह्या, पाटी, पेन्सिल्स, अक्षर वळणदार होण्यासाठी सुलेखन पाटी, चित्रकला वही, खडू, शब्द चित्रावली, my english यांसारखी पुस्तके असतात.
तर माध्यमिक वर्गांसाठी जोमेट्री बॉक्स, ग्राफ बुक, विज्ञानाची रुची वाढवणारी पुस्तके यांचा समावेश असतो.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर दप्तरे भरणे (स्कुल किट असेम्ब्ली) हा एक सोहळा असतो. अनेक क्षेत्रांमधले विशेषतः IT क्षेत्रातील स्वयंसेवक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात.
येत्या रविवारी ठाण्यातील जिजामाता हॉल येथे सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात तर दादर येथे 2 जून रोजी स्कुल किट असेम्ब्ली आयोजित करण्यात आली आहे.
याच ठिकाणी शाळांचे प्रतिनिधी येऊन आपली स्कुल किट्स घेऊन जातात.
Hits: 0