सेवानिवृत्त वृद्ध महिलेला 8 लाखांचा गंडा
कल्याण- पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून एका इसमाने एक वृद्ध महिलेला तब्बल 8 लाखाना गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
डोंबिवली पश्चिमेकडील वैभव अनेक्स मध्ये शुभांगी परब या 62 वर्षीय महिला राहतात .काही वर्षांपूर्वी त्यांचे पती मयत झाले त्यांना 2007 मध्ये त्यांच्या पतीचे सेवा निवृत्तीची 8 लाख रुपये रक्कम मिलाले होते .त्यांच्या परिचयाचे असणारे याच परिसरात राहणार जयवंत साटम याने त्यांना ही रक्कम एका बँकेत टाकून दुप्पट करून देतो असे आमिष दाखवले .या आमिशला बळी पडत त्यांनी साटम याला पैसे दिले मात्र बरेच वर्ष उलटूनही याबाबत साटम काहीच सांगत नसल्याने त्यांनी साटम कडे विचारपूरस केली मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .या प्ररकणी शुभांगी परब यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी साटम विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: