सेल्फी काढण्याचा नाद दोन तरुणींना जीवावर बेतला.
सेल्फी काढण्याचा नाद दोन तरुणींना चांगलाच महागात पडला.नदीला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेल्या गोंदियातील दोन तरुणींचा सेल्फी काढताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया तालुक्यातून महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरुन वाहणाऱ्या बाघ नदीतील पूर पाहण्यासाठी या तरुणी गेल्या होत्या. तरुणींची ओळख पटली असून मेघा सुखदेव शहारे(वय 21,रा.खमारी,ता.गोंदिया) व समता कन्हैयालाल न्यायखरे(वय20,गिरोला/दासगाव,ता.गोंदिया) अशी त्यांचती नावे आहेत. नदी पात्रातील पुरासोबत सेल्फी घेत असताना या दोघींचा तोल गेला आणि त्या नदीत पडल्या.
हेही वाचा :- आज आकाशात मंगळ ग्रह दिसणार
गोंदियाच्या मरारटोली स्थित युवा परिवर्तन संस्थेत (स्कील डेव्हलपमेंट संस्था) या तरुणी प्रशिक्षण घेत होत्या. आपल्या 9 मैत्रिणींसोबत त्या रजेगाव घाट परिसरातील बाघ नदीचा पूर बघण्यासाठी गेल्या होत्या. नदी पात्रातील पुरासोबत सेल्फी घेत असताना या दोघींचा तोल गेला आणि त्या नदीत पडल्या. इतर मैत्रिणींनी दिलेल्या माहितीच्या आधारे रावणवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धावत घेत शोधमोहीम राबविली. दोन्ही तरुणींचे मृतदेह मिळाले असून शवविच्छेदन करण्यासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं आहे.