सुशिक्षित बेरोजगार स्वयंरोजगार सहकारी सेवा सोसायटी यांना आवाहन
दि:१५ कौशल्य विकास,रोजगार व उद्योजक विभागा तर्फे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शासकीय तंत्रिक विद्यालय कनिष्ट महाविद्यालय,उल्हासनगर या संस्थेस १ वर्षा करीता कंत्राटी पद्धतीने साफसफाईचे काम द्यायचे आहे.तरी,इच्छुकानी आपले अर्ज सेवा सोसायट्याकडुन २२ जून २०१८ पर्यत सादर करावेत. तसेच अपूर्ण किंवा अटीची पुर्तता केली नसल्यस सेवा सोसायट्यांचा विचार केला जाणार नाही.या बाबतची संपूर्ण माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे या कार्यालयांच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे असे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे कळवले आहे.
Please follow and like us: