साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे दि.०१ – ठाणे जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग,मातंग, मिनी मादीग,मादींग,दानखाणी मांग,मांग महाशी,मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गारोडी,मादगी,मादिगा अशा १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांना २०१८ – २०१९ या शैक्षणिक वर्षातील ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.त्यासाठी १०वी ,१२वी,पदवी,पदव्युत्तर,वैद्यकीय,व अभियांत्रिकी इ.आशा अभ्यासक्रमामध्ये विशेष प्रविण्याने गुणवत्ता मिळवुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी आपली नाव द्यावे.

आवशक असलेले कागद पत्रे जातीचा दाखला,उत्पन्नचा दाखला,रेशनकार्ड,शाळेचा दाखला,मार्कशीट,२ फोटो,पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह 2 प्रतित पूर्ण पत्यासह दि.१० जुलै पर्यंत सादर करावा अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३८८४१३ वर संपर्कसाधावा.असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,विकास महामंडळ मुंबई जिल्हाधिकारी कार्यलय, ५ वा मजला,ठाणे यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email