सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांची ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयास भेट
(श्रीराम कांदु )
सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी आज ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधला तसेच रुग्णांसाठी जन धन खाती उघडण्यात आली त्याचा शुभारंभ केला. मानसिक आरोग्य सप्ताहाच्या सांगता समारंभात ते सहभागी झाले तसेच दिवाळीनिमित्त रुग्णांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू पाहून कौतुक केले. यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.
यानंतर आरोग्यमंत्र्यांनी उपसंचालक डॉ रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी एस सोनावणे यांच्याशी चर्चाही केली.

Please follow and like us: