सारस्वत निवासी भाग 20 तासापासून विजेविना ,उकाड्याने नागरिक त्रस्त

डोंबिवली – डोंबिवलीतील निवासी भाग असलेल्या प्रसिद्ध सारस्वत निवासी संकुलात रात्री 12 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाल्याने ऐन उन्हाळ्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले होते मध्यरात्री वीज खंडीत झाल्याने व घरात थाबणे शक्य नसल्याने नागरिक रस्त्यावर आले होते
महावितरण कार्यालयात फोन केले असता त्याला प्रतिसाद मिळाला नाही कर्मचारी फोन उचलत नव्हते.
येथील रहिवासी नेहाल थोरावडे याने सांगितले की मध्यरात्री वीज पुरवठा विस्कळीत होत होता बाजी प्रभू चौकात फोन केला तर कर्मचारिफोन घेत नव्हते तसेच सकाळी कार्यालयात तकार केली तर बघू असे उत्तर दिले रात्री पासून सायंकाळी 5 वाजले तरी वीज पुरवठा सुरू नव्हता
या संदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना विचारले असता त्यांनी विजेची मागणी वाढल्याने ट्रान्सफरमर ताण येतो व तो बंद पडतो थोड्या वेळात वीज पुरवठा सुरू होईल असेही त्यांनी सांगितले.
Please follow and like us: