सामुदायिक आदिवासी विवाह सोहळा उत्साहात संपन्न.

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.०६ – जायंटस् ग्रुप ऑफ उरण, श्री समर्थ सखी स्वयंसहायता संस्था उरण व शिवराज युवा प्रतिष्ठान उरण यांच्या संयुक्त विद्यमाने,धर्मादाय आयुक्त पुरस्कृत सामुदायिक विवाह सोहळा समिती मुंबई यांच्या सहकार्याने रविवार दि.५ मे २०१९ रोजी उरण मध्ये पहिल्यांदाच एन आय हायस्कूल मैदान येथे आदिवासींचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून मान्यवरांच्या उपस्थितीत नागरीकांच्या शुभाशिर्वादाने मोठ्या उत्साहात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. दुर्गम डोंगरकपाऱ्यात रहाणाऱ्या रानमेवा-मध,लाकुडफाटी विकुन,पावसाळ्यात डोंगर उतारावर शेती व इतरवेळी रोजंदारीवर काम करणारी ही आदिवासी जमात तशी आपल्या चांगल्याच परिचयाची.शहरापासुन लांब वस्ती करून जगणाऱ्या या आदिवासी बांधवाचे जिवनमान तसे अतिशय भिन्न. रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कित्येक ठिकाणी या आदिवासींच्या वाड्या आपणास आढळतात.सामान्यत: आपण त्यांना कातकरवाडी वा ठाकूरवाडी संबोधतो.कातकरी अतिशय काटक,पडेल ते काम करणारे तर ठाकुर हे वृक्षतोड वा छाटणी करणारे,लाकुडफाटा विकुन उदरनिर्वाह करणारे.

या आदिवासी समाजात बाप आपल्या मुलाला तु काय कर हे सांगत नाही.तसेच वयात आलेली (इथे बारा ते पंधरा वर्षे खुप झाली) मुलगा वा मुलगी आपल्या मर्जीने कोणाशीही विवाह करू शकतात वा लग्नाविना तसेच राहतात.लग्न न करताच शारिरीक संबंधातुन गर्भधारणा झाल्यास गर्भपात न करता जन्मास येणाऱ्या अपत्यांचे सर्वसाधारण मुलासारखेच संगोपन केले जाते.मुलगा आपल्या सासरी जाऊन बिनदिक्कत राहु शकतो.मुलगीही आपल्याला आवडणाऱ्या मुलाच्या घरी जाऊन राजरोस राहायला लागते.व यापैकी कुठल्याही गोष्टीला कोणीही विरोध करित नाही.त्यामुळेच तेथे पिढ्यान् पीढया सुखाने, आनंदाने नांदतात.यांना गरज नसते जन्माच्या,लग्नाच्या वा मृत्युच्या दाखल्याची.तेथे नाहीत वृध्दाश्रम,अनाथाश्रम वा इस्टेटीवरून भांडणे.तर अशा या आदिवासी समाजातील बावीस वर-वधुचे “शुभमंगल” आज रविवार दि.५ मे २०१९ रोजी “सामुदायिक विवाह सोहळा समिती,मुंबई” यांच्या संपुर्ण सहयोगाने मोठ्या उत्साहात उरण मध्ये उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला.

आदिवासी समाजातील एकुण 22 जोडपे यावेळी उपस्थित होते. एकूण 22 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अशोक गोरे(राष्ट्रपती पोलिस पुरस्कार प्राप्त),मनीष मजेठिया, किरण करळकर,मोहिनी वैद्य,आ.मनोहर भोईर,भूषण पाटिल(JNPT माजी विश्वस्त),सायली म्हात्रे(नगराध्यक्ष उरण),गौरी देशपांडे(अध्यक्ष उरण महिला सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक संस्था उरण),सुजाता गायकवाड(महिला संघटक शिवसेना उरण),सीमा घरत(महिला अध्यक्ष शेकाप उरण),जेष्ठ नागरिक संघाचे विजय सुळे आदि मान्यवर उपस्थित होते. अष्ठविनायक कलामंच आवरे तर्फे सुरेल गीतांचा आर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी गायक गणेश गावंड,ढोलकी वादक-महेश गावंड,कौशिक ठाकुर, संदीप गावंड, मधुकर कडु आदि अष्ठविनायक कलामंच आवरेच्या पदाधिकारी व्यक्तिंनी खूप उत्तमरित्या सुरेल गीतांचा कार्यक्रम सादर केले.हिंदु धर्म संस्कृती पद्धतीने प्रकाश कानडे(भटजी-कर्जत)यांनी उपस्थित जोडप्यांचा विवाह लावून दिला.

अध्यक्षस्थानी असलेले अशोक गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मुलींनी सारखे आई वडीलांना फोन लावु नये त्यामुळे सांसारिक संबंधात बिघाड निर्माण होतात.सुखाने नांदा,चांगला संसार करा, गुण्यागोविंदाने रहा असा मौलिक सल्ला दिला. तर भूषण पाटिल (JNPT माजी विश्वस्त)यांनी कर्ज काढून लग्न करु नका, आगरी समाजात एक चांगली प्रथा आहे ती प्रथा म्हणजे लग्ना मध्ये हूंडा घेत नाहीत,मांडव प्रथा, साखरपुडा मध्ये दारू मटनाची प्रथा बंद होत आहे, लग्नातील अनावश्यक खर्च टाळावा,तो खर्च गोर गरीब लोकांच्या कल्याणासाठी वापरावा. साखर पुडयाला फक्त रक्ताचीच माणसे जातात. आज सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. आयोजकांनी खूप चांगले नियोजन व उत्तम उपक्रम राबविला आहे असे मत भूषण पाटिल यांनी व्यक्त केले. वरवधूंना भांडे,कपडे, ब्लँकेट, चादर, चटई, साडया आदि संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरणचे अध्यक्ष संगीता ढेरे, शिवराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश ठाकुर, जायंट्स ग्रुप ऑफ उरणचे संस्थापक अरुण पाठारे,अध्यक्ष देवेंद्र पिंपळे तसेच पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email