सामनाच्या अग्रलेखातुन भा.जा.प.वर घणाघाती टिका

(स्वदेश मालवीय)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातुन भा.जा.प.वर चांगलाच निशाणा साधला आहे.तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यानी भजपावर नाराजी जाहिर केल्यानंतर अग्रलेखातुन उद्धव ठाकरे यांनी भा.जा.प.चा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले व त्याच खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा प्रयत्न भाजपने केला,’ अशी टीका करत आता चंद्राबाबूंनीही ‘लव्ह जिहाद’ मोडून स्वाभिमानाचा जिहाद पुकारला आहे अस त्यांनी व्यक्त केले आहे. हिंदुस्थानातील ६०० कोटी जनतेने भारतीय जनता पक्षाला मतदान करून सत्तेवर आणले असे मोदी जागतिक व्यासपीठावर बोलले.हिन्दुस्तानची लोकसंख्या १२५ कोटी असताना उर्वरित पावणेचाराशे कोटी मतदार चंद्रावर की मंगळावर आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी युती करायची, सत्ता मिळवायची आणि नंतर हळूहळू मित्रपक्षालाच खच्ची करून हातपाय पसरायचे ही भाजपची ‘मोडस् ऑपरेंडी’ असल्याचे तेलुगू देसमचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात त्यांची ही ‘मोडस् ऑपरेंडी’ की काय ती शिवसेनेने चालू दिलेली नाही व सर्व कटकारस्थानांचा फडशा पाडत महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमानाचा भगवा झेंडा फडकत ठेवला आहे. अशी घणाघाती टिका करत त्यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email