सात वर्षाच्या बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करून ठार मारणाऱ्या दोन आरोपींना अटक – डोंबिवलीतील घटना

डोंबिवली दि.१८ – देसलेपाडा डोंबिवली येथे आपल्या घराजवळ खेळत असताना ७ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून जीवे मारणाऱ्या दोन बिहारी तरुणाना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

इहसान आलम (२२) व नदीम आलम (२१) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्याना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

त्या बालकाचे वडील आत्माराम वारंग यांनी मुलगा खेळत असताना बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर मानपाडा पोलिसांनी तपास केला असता आर्किड इमारतीच्या ड्रेनेज टाकीत त्या बालकाचे शव मिळाले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन कअब्दूलले यांनी विविध टीम करून तपास केला असता इहसान आलम व नदीम आलम यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश राऊत पुढील तपास करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email