साई संस्थान शिर्डी देणार अहमदनगर शहराच्या स्वच्छतेसाठी ३५ लाख.

( म विजय )

अहमदनगर – शहराच्या स्वच्छतेसाठी साईबाबा संस्थान व्यवस्थापन मंडळाने दरमहा ३५ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली असून राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यास अखेर यश आले आहे. दि. १ डिसेंबरपासून शहराच्या स्वच्छतेचा ठेका बीव्हीजी कंपनीस देण्यात आला असून शहरासह सर्व प्रभागांची स्वच्छता केली जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष योगिता अभय शेळके यांनी दिली.

प्रसिद्धीपत्रकात नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी म्हटले की, शिर्डी शहराच्या स्वच्छतेसाठी साईबाबा संस्थानकडून निधी मिळावा यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थान व्यवस्थापन मंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्याशी चर्चा केली होती. अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सर्व विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत नगरपंचायतला स्वच्छतेसाठी दरमहा ३५ लाख रुपये देण्यास मान्यता दिली आहे.

शहराची साफसफाईची जबाबदारी बीव्हीजी (भारत विकास ग्रुप) या नामांकित कंपनीला ५ वर्षांसाठी दिली असून नगरपंचायत व या कंपनीत तसा करार झाला आहे. येत्या १ डिसेंबरपासून ही कंपनी स्वच्छतेच्या कामास सुरुवात करणार आहे. साईसंस्थानचे ३५ लाख व शिर्डी नगरपंचायत ७.५ लाख रुपये असे एकुण दरमहा रुपये ४२.५ लाख खर्च करुन शिर्डी स्वच्छ व सुंदर ठेवण्यात येणार आहे.

शहरातील सर्व १७ वॉर्डात १७ घंटागाड्या घरोघरी जाऊन कचरा विलगीकरण करून गोळा करणार आहे. यातील ५ घंटागाड्या २ शिफ्टमध्ये काम करणार आहेत. दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या ५ घंटागाड्या शहरात व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा कचरा थेट ते करत असलेल्या व्यवसायाच्या ठिकाणाहून गोळा करणार आहेत.

शिर्डी शहरातील सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंटचा कचरा गोळा करण्यासाठी ५ ट्रॅक्टर पहिला शिफ्टमध्ये व ३ ट्रॅक्टर दुसऱ्या शिफ्टमध्ये असे एकूण ८ ट्रॅक्टर उप्लब्ध असणार आहेत. शिर्डी शहर साफसफाई करण्यासाठी सुमारे ३० कर्मचारी संपूर्ण २४ तास शहरातील मुख्य परिसर झाडु मारून सफाई करणार आहेत. शहरातील ८० किलोमीटर इतक्या अंतराचे प्रमुख रस्ते ट्रक माउंटेड रोड स्वीपर या मशिनद्वारे साफ करणार आहेत.

शहरातील प्रत्येक वॉर्डमधील उपनगरांची सर्वत्र साफसफाई व्हावी, म्हणून १९ स्वच्छता कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शहराबरोबरच उपनगरांमधील परिसराची साफसफाई होण्यास मदत होणार आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, शिर्डी शहर व परिसरात साथीचे आजार उद्भवू नयेत, शहरात सर्वत्र वेळोवेळी औषध फवारणी नियमितरीत्या व्हावी, यासाठी तसा करारदेखील करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email