सर्व विरोधकांच्या एकजुटीचा भाजपावर परीणाम होणार नाही -अमित शहा
सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदींना हरवणं शक्य नाही….
एके काळी इंदिरा गांधिविरोधात सर्व विरोधी पक्ष एकजुट होत असत आता मोदींच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येत आहेत.आज ६७ टक्के भारतावर भाजपाची सत्ता आहे.असे मत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलंय.२०१९ ला होणा-या निवडणुकित सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असले तरी मोदींना हरवण्याचं बळ त्यांच्यात नसल्याचं स्पष्ट करत शाह यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीचा भजपावर परिणाम होणार नसल्याचे वर्तवले आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवानंतर भाजपाविरोधात विरोधी पक्षांची महाआघाडी स्थापन होण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.याप्रकरणी बोलताना त्यांनी सदर मत व्यक्त केले.विरोधी पक्ष आणत असलेल्या अविश्वास ठरावा बद्दल बोलताना एनडीए कड़े ३०० पेक्षा जास्त खासदार असल्याने आपण या प्रस्थावाला सहज सामोरे जावू असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.