सर्विस सेंटरमध्ये बालाकामगार प्रकरणी तिघा विरोधात गुन्हा

डोंबिवली दि.२२ – बालकामगारांना राबवल्या प्रकरणी डोंबिवली पूर्वेकडील बदलापूर रोडवरील तिघाविरोधात मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन मुलाची सुटका करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील विश्वनाथ भंडारी यांचे काटई कोळेगाव येथील गावदेवी सर्विस सेंटर ,भूपेंद्र कनोजिया यांच्या मालकीची मे नंदू चौधरी जीन्स वाशिंग सेंटर ,तर जगदीश कालण यांच्या मालकीचे काळण सर्विस सेंटर या ठिकाणी अल्पवयीन मुले काम करत अस्ल्याच्या तक्रारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यलयात प्राप्त झाल्या होत्या.या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक कामगार आयुक्त कल्याणच्या पथकाने या ठिकाणी छापे टाकले असता बालमजूर कारत असल्याचे निदर्शनास आल्याने या पथकाने या प्रकरणी विश्वनाथ भंडारी, भूपेंद्र कनोजिया, जगदीश कालण विरोधात मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email