सरकारी नोकरीचे आमिष दाखवत ६ लाख ९५ हजारांना गंडा
डोंबिवली – मुलीला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला महिलेनेच तब्बल ६ लाख ९५ हजारांचा गंडा घातल्याची घटना उजेडात आली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी उज्वला नाईक या महिलेसह अशोक शिंदे ,सावंत ,राठोड या तिच्या साठीदाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
मुंबई मुलुंड येथे राहणार्या हेमांगी नानोसकर हि महिला आपल्या मुलीसाठी नोकरीच्या शोधात होती तिची ओळख दोन वर्षा पूर्वी कल्याण मध्ये मंगेशी फ्लोरा येथे राहणाऱ्या उज्वला नाईक या महिलेशी झाली .उज्वला आपल्या साथीदारांच्या मदतीने नानोंसकर यांना तुमच्या मुलीला सरकारी नोकरी लावून देते असे आमिष दाखवत त्यांच्याकडून पहिल्यांदा चार ३५ हजार त्यानंतर २ लाख ६० हजार रुपये असे मिळून एकूण ६ लाख ९५ हजार रुपये घेतले .मात्र दोन वर्ष उलटूनही नोकरी बाबत काहीच हालचाल झाली नसल्याने नानोसकर यांनी पैसे परत मागितले .मात्र उज्वला ने उडवा उडवी ची उत्तरे दिल्याने तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .अखेर या प्रकरणी नानोसकर यांनी काल रात्री महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी उज्वला नाईक या महिलेसह अशोक शिंदे ,सावंत ,राठोड या तिच्या साठीदाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे