सप्टेंबर 2018 साठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक
सप्टेंबर 2018 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) 128.6 इतका राहिला जो सप्टेंबर 2017 च्या तुलनेत 4.5 टक्के अधिक आहे. एप्रिल-सप्टेंबर 2018 मध्ये औद्योगिक विकास दर गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 5.1 टक्के राहिला.
सप्टेंबर 2018 मध्ये खाण, निर्मिती आणि वीज क्षेत्रात उत्पादन वाढीचा दर सप्टेंबर 2017 च्या तुलनेत अनुक्रमे 0.2 टक्के, 4.6 टक्के आणि 8.2 टक्के राहिला. तर एप्रिल-सप्टेंबर 2018 मध्ये या तिन्ही क्षेत्रांचा उत्पादन वृद्धि दर गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे 3.3, 5.3 आणि 6.2 टक्के राहिला . या काळात फर्निचरच्या निर्मितीत 32.8 टक्के इतकी सर्वाधिक वाढ नोंदली गेली. तंबाखू उत्पादनांच्या निर्मितीने (-)7.3 टक्के वाढ नोंदवली.
हेही वाचा :- नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘हुनर हाट’चे उद्घाटन मुख्तार अब्बास नक्वी करणार
उपयोग आधारित वर्गीकरण अनुसार सप्टेंबर 2018 मध्ये प्राथमिक वस्तु (प्राइमरी गुड्स), भांडवली वस्तू ,मध्यवर्ती वस्तु आणि पायाभूत निर्माण वस्तूंचा वृद्धी दर सप्टेंबर 2017 च्या तुलनेत अनुक्रमे 5.8 टक्के, 1.4 टक्के आणि 9.5 टक्के राहिला. टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वाढीचा दर सप्टेंबर 2018 मध्ये 5.2 टक्के राहिला,. तर बिगर-टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंचा वृद्धि दर सप्टेंबर 2018 मध्ये 6.1 टक्के राहिला..
ऑक्टोबर 2018 चा निर्देशांक बुधवार 12 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केला जाईल.