सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देशभरात १०९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले!

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देशभरात १०९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २७ जुलै २०१८ रोजी असून ब्राम्हण विद्यालय शाळा, आयप्पा मंदिर शेजारी, शास्त्रीनगर शेवटचा बसस्टॉप,वर्तकनगर, ठाणे (प.) येथे गुरुपौर्णिमा महोत्सवां आयोजन करण्यात आले आहे.

हिंदूंच्या लक्षावधी वर्षांच्या संस्कृतीतील अद्वितीय परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्त्कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या, आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केले आणि आदर्श अशा धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेची स्थापना केली.

हेही वाचा :-  आर्ची अर्थात, रिंकू राजगुरू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

या परंपरेविषयी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करणे, अनादी काळापासून चालू आहे. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती अन्य समविचारी संघटनांसह यंदा देशभरात १०९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात ठाणे आणि डोंबिवली येथे महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :- नालासोपारा : भरस्त्यावर गुंडाचा एन्काऊंटर

या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि गुरुपूजन; ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटनाचे अद्वितीय कार्य’ या विषयावरील लघुपट; समाज, राष्ट्र आणि धर्म यांप्रती कृतीशील मान्यवरांचे विचार, तसेच ‘धर्मविहीन लोकशाही आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावरही मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात आपत्काळात समाजसाहाय्यासाठी आवश्यक प्रथमोपचार प्रात्यक्षिके आणि बचाव अन् आक्रमण शिकवणारी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहेत.

तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email