संतप्त फेरीवाल्यांंचा डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा …

डोंबिवली दि.२१ – हातावर पोट असलेल्या फेरीवाल्यांना बसल्यास जागा दिली नसून दुसरीकडे स्टेशनबाहेरील परिसरात पालिकेच्या कारवाईची टांगती तलवार यामुळे अखेर फेरीवाल्यांच्या सहनशीलतेच अंत झाला. अखेर या कारवाईला कंटाळून संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयावर सायंकाळी धडक मोर्चा काढला. मात्र सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर आले असता फेरीवाल्यांना परतावे लागले. तर पालिकेने काही फेरीवाल्यांचा नाशवंत माल परत दिला.

मंगळवारी नेहमीप्रमाणे पालिकेचे फेरीवाला हटाव पथकाने कारवाई करून माल जप्त केला. यावर संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. आमचा माल जप्त करता, मग आम्हालाही अटक करा असे ओरडत फेरीवाल्यांनी काढलेल्या मोर्च्यामुळे काही वेळ वातावरण तापले होते.

मात्र काही वेळाने मात्र सहाय्यक पोलीस आयुक्त वाडेकर सदर ठिकाणी आले. कायदा हातात घेणाऱ्यांना अटक करू असे सांगतात फेरीवाल्यांना परत जावे लागेल. त्यानंतर कष्टकरी हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे आणि उपस्थित काही फेरीवाल्यांची वाडेकर यांनी समजूत काढत पालिका आयुक्त बोराडे यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा सल्ला दिला. यावेळी प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांसह कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान फेरीवाल्यांबाबत पालिकेने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे अन्यथा आम्हाला काम कारवाई करताना भीती वाटत असल्याचे सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email