डोंबिवली – गेल्या काही दिवसांपासून कल्याण पूर्वेकडील काही भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत असून नागरिकां मध्ये महावितरण विरोधात संतापाची लाट पसरली आहे . याबाबत बुधवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ७० ते ८० जणांनी कल्याण पूर्वेकडील महावितरणच्या काटेमानवली कोळशेवाडी कार्यलतात धडक दिली व संताप अनावर झालेल्या नागरिकांनी महावितरण कार्यलयात तोड फोड करत तेथे असलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत आपला संताप व्यक्त केला .य प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तोडफोड करणाऱ्या ७० ते ८० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .