संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन अर्जुन कदम यांना राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार
संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन अर्जुन कदम ह्यांची महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे दिल्या जाणार्या अतिशय प्रतिष्ठीत व सन्मानिय समजल्या जाणार्या राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून रविवार, दिनांक ०३/०६/२०१८ रोजी, अक्कलकोट येथील एका जाहीर कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार, दिनांक ०३/०६/२०१८ रोजी, अक्कलकोट येथे संपन्न झाले. महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षी राज्यभरातून निवडक नऊ व्यक्तिंना ‘राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार’ देण्यात येतात. विविध श्रेत्रातील निस्पृह व सेवाभावी वृत्तिने कार्यरत असणार्या कर्तबगार व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
यंदाच्या २०१८ या वर्षी सामाजिक श्रेत्रातील अभुतपुर्व कामगिरीबद्दल ‘राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार’ कल्याणमधील संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष, सचिन अर्जुन कदम यांना प्रदान करण्यात आला.
ह्या पुरस्कारमुळे सचिन कदम ह्यांना.., यापुर्वी या पुरस्काराचे मानकरी ठरलेले पद्मश्री उज्ज्वल निकम, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, पद्मश्री नागनाथ नायकवडी, पद्मश्री डाॅ. डी.वाय.पाटील, साधनाताई आमटे, गोल्डन गर्ल तेजस्विनी सावंत, राशीचक्रकार शरद उपाध्ये, प.पू. भैय्यूमहाराज आदी दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याचा बहुमान लाभला आहे.