श्री गणेश मंदीर संस्थान आणि विवेकानंद केंद्र डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने नित्य पाठातील वैदिक सूक्ते आणि पातंजल योगदर्शन या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित
श्री गणेश मंदीर संस्थान आणि विवेकानंद केंद्र डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १८ में रोजी नित्य पाठातील वैदिक सूक्ते आणि पातंजल योगदर्शन या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
डॉ.भीमराव कुळकरणी आणि डॉ.श्रीराम आगाशे लिखित सदर पुस्तकांचा हा प्रकाशन सोहळा सायंकाळी ६.३० वाजता विनायक सभागृह ,दूसरा मजला श्री गणेश मंदीर येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र संघटक प्रा.विश्वास लपालकर तसेच ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आणि नामवंत लेखक डॉ.उल्हास कोल्हटकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल.शहरातील वाचनप्रेमी जनतेने या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश मंदीर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले,आणि विवेकानंद केंद्र डोंबिवलीच्या नगर संचालिका डॉ.ललिता नामजोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.