श्री गणेश मंदिर संस्थानच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
श्री गणेश मंदिर संस्थानचा ९४ वा वर्धापन दिन
श्री गणेश मंदिर संस्थानचा ९४ वा वर्धापन दिन संपन्न होतोय.सदर वर्धापन दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने गुरूवार दिनाक ३-०४-२०१८ रोजी सकाळी ६ वाजता श्रींची महापूजा,शुक्रवार दिनांक ४-०५-२०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ.परीक्षित शेवडे यांचे व्याख्यान,शनिवार दिनांक ५ में २००१८ रोजी सकाळी ७ वाजता रामपंचायतन याग व सायंकाळी ७ वाजता भंडारा (महाप्रसाद),रविवार दिनांक ७-०५-२०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ.सौ.गीताली पुंडकर (अकोला)यांचे सुश्राव्य गायन असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.त्याच प्रमाणे यंदा अधिक मासानिमित्त विशेष भागवत कथा गुरूवार दिनाक १७ में ते बुधवार दिनाक २३ में दरम्यान संपन्न होणार आहे.भागवताचार्य विवेक घळसासी (नागपुर) यांचा यात सहभाग असेल.यासर्व कार्यक्रमांचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.