शौचालयाचे महत्व सांगणारा जिल्हा परिषदेचा चित्ररथ गावोगावी फिरणार
( श्रीराम कंदु )
जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधत ठाणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शौचालयाचे महत्व सांगणारा एल.ई.डी चित्ररथ गावोगाव फिरणार आहे. रविवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला. पुढील काही दिवसांसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शौचालयाचे महत्व सांगत हा एल.ई.डी चित्ररथ रवाना झाला आहे.
Please follow and like us: