शोभेच्या दारुकामामुळे सोलापूरच्या यात्रेत भीषण स्फोट; २५ जण जखमी

(म विजय)

सोलापूर- येथील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावात मळसिद्ध महाराजांच्या यात्रेवेळी गंभीर घटना घटली आहे. या यात्रेत शोभेच्या दारुकामामुळे भीषण स्फोट झाला आहे.

या स्फोटात तब्बल २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एका महिलेला आपला एक डोळा गमवावा लागला आहे. या स्फोटाची तीव्रता जास्त असल्यामुळे यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

सोलापूरच्या यात्रेतील स्फोटात २५ जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांकडून जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आणि त्यांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email