शेतकाऱयांवर अन्याय होऊ देणार नाही…कांदळवन लागवडीसाठी सर्वेक्षण पुढे ढकलले…आ. केळकर.
म विजय
मोघरपाडा येथील कांदळवन लागवडीसाठी होऊ घातलेले सर्वेक्षण अखेर पुढे ढकलले आहे. कांदळवनामुळे सीआरझेडचे नियम लागू होऊन किकासकामांना खीळ बसणार होती तर शेतकर्यांवरही अन्याय होणार होता. आ. संजय केळकर यांनी महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर सर्वेक्षण पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकऱयांची पुन्हा बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आ. केळकर यांनी सांगून शेतकऱयांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असेही सांगितले.
घोडबंदर परिसरातील मोघरपाडा गावातील शेतकर्यांच्या जमिनीवर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कांदळवन लागवडीकरिता सर्वेक्षण आज करण्यात येणार होते. तत्पूर्वीही नोटीसा मिळाल्याने भयभीत झालेल्या स्थानिक शेतकर्यांनी आ. संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी श्री. केळकर यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन शेतकर्यांची बाजू मांडली होती. तर जिल्हा प्रशासनाकडेही याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. महसूलमंत्र्यांनी याबाबत आ. केळकर यांना शेतकर्यांवर अन्याय होणार नसल्याचे आश्वासनही दिले होते. तर जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्याकडेही शेतकर्यांची बाजू मांडली होती.
आज सर्वेक्षण होणार असल्याने स्थानिक शेतकरी मोघरपाडा येथील शेतजमिनीवर जमले होते. त्यावेळी आ. संजय केळकर यांनी शेतकर्यांची भेट घेऊन पाहणी दौरा केला आणि महसूलमंत्री आणि जिल्हाधिकार्यांनी आश्वस्त केल्याची माहिती शेतकऱयांना दिली तसेच सर्वेक्षणही पुढे ढकलल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकरयांनी समाधान व्यक्त करीत आ. केळकर यांचे आभार मानले