शिवसेनेच्या शहापूर तालुका उपप्रमुखाची निर्घृण हत्या
शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या
पालघर – शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. देवचोळे येथे त्यांची हत्या करुन मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास घरी, बाहेर जातो म्हणून सांगून निघाले होते. मात्र रात्रभर घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. तर शुक्रवारी दुपारच्या सुमाराला त्यांचा मृतदेह गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाजवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर शैलेशचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
Please follow and like us: