शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या रौप्यमहोत्सवदिनी नेत्रचिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबीर
(श्रीराम कांदु)
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष डोंबिवली व रोटरी क्लब ऑफ़डोंबिवली अपटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंब राष्ट्रीय ग्राहक दिनी आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या रौप्यमहोत्सवदिनी मोफत नेत्रचिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबीराचे आयोजन डोंबिवली स्टेशन परिसरात रविवारी करण्यात आले होते.या शिबिरास भरपूर प्रतिसाद मिळाला. म्हैसकरांचे आय आरबी व अनिल आय हाँस्पिटल यांनी या शिबीरासाठी सहकार्य केले.शिवसेना डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख भाई पानवडीकर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष डोंबिवलीचे कक्ष प्रमुख राजेंद्र सावंत, अविनाश बेनके, अभिजित माळवदे, नितीन पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष ठाणे कक्ष जिल्हा प्रमुख दिनेश घाडीगांवकर, कक्ष जिल्हा प्रमुख सुनील वायले, कक्ष उपजिल्हाप्रमुखराधिका जोशी, तुप्ती पाटील, या मान्यवरांनी भेट देउन शिबिराच्या प्रतिसादाबद्दल स्तुती केली. या शिबिराचे आयोजन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षशहरप्रमुख भाई पानवडीकर , कक्ष उपशहरप्रमुख राजेंद्र सावंत, कक्षप्रमुख नितीन पवार , अभिजित माळवदे आणि अविनाश बेनके केले होते. यावेळी भाई पानवडीकर म्हणाले की, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा रौप्यमहोत्सवदिन आहे. जागो ग्राहक जागो हा बाळासाहेबांचा संदेश आहे. ग्राहक कक्षाचे सरचिटणीस अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात व्हावा याकरिता या शिबीराचे आयोजन डोंबिवली स्टेशन परिसरात करण्यात आले.विविध संस्थेनी यासाठी सहकार्य केले. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ व अनिल हाँस्पिटलच्या डॉक्टर अनघा हेरुर यासुद्धा या शिबराच्या मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. डोळ्यांची निगा व विकारांवर त्या म्हणाल्या की, डोळे हि सुष्टीची मोठी देणगी हा आत्मा आहे. दुष्टी असेल तर सुष्टी दिसेल. डोळ्यांचे कितीतरी विकार आहेत. त्यांचे लवकर निदान झाले नाहीतर डोळ्यावर परिणाम होतात.त्यासाठी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. डोळ्याचा पडदा, नेत्रपटल, नजर कशी आहे, डोळ्याचा प्रेशर याची तपासणी केली जाते.