शिवसेना आरोग्य दौड मीनी ज्येष्ठ नागरिक मॕरेथाॕन संपन्न   

श्रीराम कांदु 

डोंबिवली : वाढती लोकसंख्या ,अपुऱ्या नागरी सुविधा,वाढती गुन्हेगारी  ,प्रदुषण ,अपघात याबाबत सरकार व प्रशासनाची उदासीनता यामुळे डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. अशा परिस्थितीत सकाळी लवकर उपस्थित राहून या ज्येष्ठ नागरिकांच्या मीनी मॕरेथाॕन मध्ये उत्साहाने सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. यांच्याकडून आजच्या पिढीने जीवन संघर्षासाठी सकारात्मक उर्जा घेतली पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख व दक्षिण रायगड संपर्क प्रमुख  सदानंद थरवळ यांनी  केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 91व्या जयंती निमित्ताने डोंबिवली शाखेच्या वतीने शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष भगवा  सप्ताहाचे अंतर्गत विविध शाखांतर्फे समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याचाच एक भागा म्हणून आज सकाळी सात वाजता इंदिरा चौक येथून सुदृढ आरोग्यासाठी धावण्याचे महत्व पटवून देणाऱ्या ज्येष्ठ डोंबिवलीकरांच्या मीनी मॕरेथाॕन अर्थात आरोग्य दौडचे आयोजन करण्यात आले होते.डोंबिवलीकर  आजी आजोबांनी उत्साही सहभाग घेऊन ही दौड यशस्वी केली त्यांचे कौतुक करताना थरवळ बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर 98 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक  रघुनाथ केतकर ,वैशाली दरेकर ,राजेश मोरे,कविता गावंड,किशोर मानकामे,संतोष चव्हाण ,सुधाकर वायकोळे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित  होते.केतकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात झालेल्या या मरेथॉन मध्ये वय वर्ष 60 ते 98 वयापर्यंतच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला . 60 ते 69 व 70 पुढील अशा दोन गटात पुरुष व महिला विभागात या स्पर्धेत 70 वर्षांपुढील वयोगटात प्रथम क्रमांक मोहम्मद गफर व शरयू काळे ,द्वितीय बबन करंजे ,रेणुका देढीया तृतीय धातू परब,शोभा पुजारी तसेच 70 वर्षांखालील गटात प्रथम हेमंत धावते व शैला पाटील द्वितीय विनायक कारखानीस,जया राणा तृतीय अनिल चौधरी,सुजाता भुसे या स्पर्धकांनी पारितोषिके पटकावली .81 वर्षांच्या शशिकला परळकर यांना उत्तेजनार्थ विशेष पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले.    मानपाडा रोडवरील इंदिरा चौकातून सुरु झालेली ही आरोग्य दौड चार रस्ता,लोकमान्य टिळक यांचा पुतळा ,मदन ठाकरे चौक,बाजीप्रभू चौक मार्गे इंदिरा चौक अशी पूर्ण झाली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email