शिवजयंती निमित्त मनसे डोंबिवली शहराच्या वतीने आनंद बालभवन येथे भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन

डोंबिवली – आज शिवजयंती निमित्त मनसे डोंबिवली शहराच्या वतीने आनंद बालभवन,रामनगर,डोंबिवली पुर्व येथे भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कलाकार प्रमोद पवार यांनी केले.सदर रांगोळी प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट रांगोळीच्या माध्यमातुन उलगडण्याचा प्रयत्न डोंबिवलीच्याच रांगोळी कलाकारांनी केला असुन यांत महाराजांच्या आयुष्यातील प्रमुख घटना रांगोळीरुपाने साकारण्यात आल्या आहेत असे शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी सांगितले.

सदर रांगोळी प्रदर्शन ४,५ आणि ६ मार्च रोजी सकाळी ९.०० ते रात्रौ ९.०० या वेळेत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील.त्याचबरोबर डोंबिवली शहरातील सारस्वत काॅलनी,इंदिरानगर,पाथर्ली,गोग्रासवाडी,गांधीनगर,अंबिकानगर,पांडुरंगवाडी,संगीतावाडी,दत्तनगर,आयरे गांव,देवीचा पाडा,उमेशनगर,जुनी डोंबिवली,जय हिंद काॅलनी आदी प्रभागात शिवजयंती साजरा करण्यात आली.

सदर प्रसंगी शहरअध्यक्ष मनोज घरत,प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,जिल्हाध्यक्ष तथा गटनेते प्रकाश भोईर,जिल्हा अध्यक्षा दिपीका पेडणेकर,जिल्हा संघटक राहुल कामत,हर्षद पाटील,जिल्हा सचिव प्रकाश माने,उपजिल्हाअध्यक्ष सुदेश चुडनाईक,शहरअध्यक्षा मंदा पाटील,शहरसंघटक प्रल्हाद म्हात्रे,नगरसेविका सरोज भोईर,उपशहरअध्यक्ष मिलिंद गायकवाड,विभागअध्यक्ष निषाद पाटील,केदार चाचे,मिलिंद म्हात्रे,रमेश यादव,वेद पांडे,श्रीकांत वारंगे,विजय शिंदे,रांगोळी कलाकार उमेश पांचाळ यांसह मनसे सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.

तमाम शिवप्रेमी नागरीकांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांवर आधारीत सदर रांगोळी प्रदर्शनास आवर्जुन भेट द्यावी अशी  विनंती शहरअध्यक्ष मनोज घरत यांच्यावतीने करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email