शिळफाटा येथून एकाला अटक ; २९० गावठी बॉम्ब हस्तगत

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा १ ची कारवाई

(स्वदेश मालवीय)
ठाणे – ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा यूनिट १ ने शिळफाटा येथून एका इसमाला अटक केली असून त्याच्या कडून २९० गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत.
याबद्दल अधिक वृत्त असे की,शिळफाटा परिसरात एक इसम गावठी बॉम्ब घेवुन येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहयक पोलिस निरक्षक संदीप बागुल यांना मिळाली .त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह व इतर वरिष्ठ अधिकारी यांना याप्रकरणी कळवले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बनवुन सदर परिसरात सापळा रचला. २५  मार्चला शिळफाटा परिसरात संशयावारून पोलिसांनी एका व्यक्तीला हटकले.त्याची चौकशी केली असता त्याचे नाव प्रवीण अर्जुन पाटिल (३४)  असून तो रायगढ़ जिल्ह्यातील अलीबागचा रहिवासी असल्याचे पोलिसाना समजले.या पथाकाबरोबर असलेल्या बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाद्वारे त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे असणा-या पिशवीत २९० गावठी बॉम्ब सापडले.या बॉम्बची कींमत 2 लाख ३२ हजार रूपये असल्याचा अंदाज आहे.याच प्रमाणे त्याच्याकडून फटाक्याची दारु,छर्रे असणारी डबी,यासारखे साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे.

प्रवीण पाटिल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून केलेल्या चौकशीत या गावठी बॉम्बचा उपयोग रानडुक्कर मारण्यासाठी होत असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान बेकायदेशीरपणे सदर बॉम्ब बाळगल्या प्रकरणी त्याच्यावर डायघर पोलीस ठाण्यात विविध कलामान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी सहयक पोलिस निरक्षक संदीप बागुल अधिक तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email