शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार रामनाथ मोते यांचाही भारतीय जनता पक्षाशी घरोबा

आमदार निरंजन डावखरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताच पक्षानं त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी बक्षीस म्हणून दिली आहे. निरंजन डावखरे यांनी भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला. त्यांना पक्षात प्रवेश दिल्याबरोबरच त्यांची कोकण पदवीधर मतदारसंघासाठी केंद्रीय समितीकडे शिफारस करण्यात आली आहे. डावखरे निश्चितच निवडून येतील असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं. डावखरे यांच्याबरोबरच शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार रामनाथ मोते यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. रामनाथ मोते यांच्या प्रवेशामुळं निरंजन डावखरे यांची बाजू मजबूत झाली असून माजी आमदार मोते यांना मानणारा मोठा शिक्षकवर्ग आहे. त्यांनी शिक्षक मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. त्याचा फायदा डावखरेंना होईल असं भारतीय जनता पक्षाला वाटत आहे.
Please follow and like us: