शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करावेत

ठाणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 (MAHATET) रविवार 8 जुलै रोजी घेण्यात येणार असून परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख  15 मे आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. एक  8 जुलैला सकाळी 10.30 ते 1 या कालावधीत आणि पेपर क्र. दोन त्याच दिवशी दु 2 ते 4.30 पर्यंत राहील.

इयत्ता 1ली ते 5वी व इ.6 वी ते 8 वी साठी सर्व व्यवस्थापन ,परीक्षा मंडळे, सर्व माध्यम ,अनुदानित/विना अनुदानित, कायम विना अनुदानित,इत्यादी  शाळांमध्ये शिक्षण सेवक तसेच शिक्षक पदावर नियुक्ती साठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या संदर्भातील सर्व निर्णय, माहिती परीक्षा परिषदेच्याhttps://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणे इत्यादी माहितीसाठी संबंधितांनी संकेतस्थळास भेट द्यावी .

    ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्यासाठीचा कालावधी  25 एप्रिल ते 15 मे पर्यंत आहे. ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट काढण्यासाठी 25 जून ते 7 जुलै असा असेल अशी माहिती जिल्हा परिषद ठाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडून करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email