शाहू,फुले,आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात,दलित मुलांना झालेली मारहाण ही अत्यंत निंदनीय घटना -छगन भुजबळ

जळगावला विहिरीत पोहायला गेल्याच्या कारणावरून दलित समाजातील तीन मुलांना अमानुष मारहाण करून त्यांची नग्न धिंड काढल्याची घटना आज घडली, सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून मनुवादी मानसिकता याला कारणीभूत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

भुजबळ यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की,शाहू,फुले,आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दलित मुलांना झालेली मारहाण ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असल्यामुळे यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email