शास्त्रीनगर रुग्णालयात चुकीचे ऑपरेशन केल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – गर्भपात आणि नसबंदी शस्त्रक्रियेसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेवर चुकीची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागल्याची घटना घडली असून याप्रकरणी गरीब रुग्णाच्या जीवाशी रुग्णालय प्रशासन खेळत असल्याचा आरोप संबधित महिलेने केला आहे.
कल्याण पिसवली मधील महिला गर्भपात आणि त्यानंतर मुल होऊ नये याची शस्त्रक्रिया करण्यासाठी शाश्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाचा काही अंश या महिलेच्या पोटात शिल्लक राहिल्याने शस्त्रक्रिये नंतर या महिलेला पुन्हा त्रास होऊ लागल्याने नातेवाईकानी तिला रुग्णालयात दाखल केले असता गर्भाचा काही अंश शिल्लक राहिल्याचे निदर्शनास आल्याने डॉक्टरांनी तिच्यावर पुन्हा उपचार करण्यात आले. दरम्यान सदर महिलेची प्रकृती ठीक असून तीला उपचारा नंतर घरी सोडण्यात आले.
याप्रकरणी संबधित महिलेच्या नातेवाईकानी गरीब रुग्णाच्या आयुष्यशी डॉक्टर खेळ करत असल्याचा आरोप केला असून गर्भपात करताना गर्भाचा काही अंश गर्भात शिल्लक राहू शकतो यामुळे डॉक्टराणी जाणीव पूर्वक संबधित महिलेच्या आरोग्याची हेळसांड केली नसल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.