शहापुरातील वाहतुक कोंडी आवरा, अन्यथा शिवसेना अंदोलन उभारणार
शहापुर – मुंब्रा बायपास वर सुरु आसलेल्या रस्त्याच्या कामा मुळे जेनएनपीटी कडील आवजड वाहतुक पनवेल- कर्जत-म्हसा- मुरबाड- सरळगांव किन्हवली-शहापुर या मार्गावर वळवली आसल्याने शहापुर येशील किसन भांडे यांच्या कार्यालया शेजारील चौकात गेल्या आठ दहा दिवसांन पासुन सकाळी व संध्याकाळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे.
याबात आनेक नागरीकांच्या तक्रारी येत होत्या त्या अनुशंघाने या चौकात पाहणी करण्यात आली. रस्त्यावर पडलेले मोठ मोठ खड्डे, सर्वीस रोडची झालेली दुरावस्ता, वाहतुक पोलिसांची अनुपस्थिती,या बाबी मुळे वाहतुक कोंडी होत आसल्याचे कळते या सर्व बाबींचा फटका किन्हवली,मुरबाड डोळखांब, सारख्या महत्वाच्या विभागातुन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना फटका बसत आहे. या सर्वांचा विचार करता सबंधित विभागाला निवेदन देवुन तोडगा काढण्याची विनंती करण्यात येणार आहे अन्यथा एका जन अंदोलनाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.या वेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपसंपर्क प्रमुख संतोष शिंदे, शहापुर संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर तळपाडे, नगरसेवक मिलिंद भोईर, प्रसिध्दी प्रमुख प्रशांत गडगे, निलेश देशमुख, उपसरपंच राजा डोंगरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.