शन्नांच्या स्मृतिप्रित्यर्थ डोंबिवलीकरांनी जागवल्या शं ना नवरे यांच्या आठवणी
डोंबिवली दि.०३ – शंन्ना साहित्य कट्टाच्या वतीने डोंबिवलीत ज्येष्ठ साहित्यिक व डोंबिवलीकर शं ना नवरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘माया आठवणीतील शंन्ना व त्याच्या निवडक साहित्याचे वाचन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी शं ना नवरे यांची सून जान्हवी नवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपिस्थित होत्या. आरती मुनीश्वर, दिपाली काळे, धनश्री सांने, मनोज मेहता यांनी शंन्नांच्या सहित्यातील निवडक प्रसंगाचे वाचन केले. तर मनोज मेहता यांनी विविध आठवणींना उजाळा दिला. नेाकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर साहित्याची सेवा करताना सामाजिक संस्थाच्या कार्याला मदत केली अशी आठवण त्यांनी सांगितली. नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी शंन्नांच्या नावे पुरस्कार सुरु करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.
Please follow and like us: