वेटर म्हणून काम करणाऱ्याने केली बार मध्ये आपल्या साथीदाराच्या मदतीने लाखोंची चोरी

कल्याण – कल्याणातील एका बार मध्ये काल रात्रीच्या सुमारस दोन अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली .हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून विशेष म्हणजे या मधील एका चोरट्याने याच बार मध्ये काही दिवसापूर्वी वेटर चे काम केले होते तर काल रात्री या चोरट्यांनी याच बार मध्ये बसून दारू प्यायल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे .
कल्याण पश्चिम येथील आधारवाडी चौकात लीला बार आणि रेस्टोरंट आहे .दोन चोर बार मध्ये घुसले आणी बारचा काऊंंटर तोडून या चोरट्याने सुमारे  एक लाख ६५ हजारांची रोकड चोरून पळ काढला धक्कादायक बाब म्हणजे यामधील एक चोरट्याने याच बार मध्ये काही दिवसानपूर्वी वेटरचे काम केले होते. हे दोन्ही चोर काल रात्री आधी बार मध्ये बसून दारू प्यायले व व बार बंद झाल्याचे पाहताच खिडकीचे स्लायडिंग उचकटून बार मध्ये घुसून रात्रीच्या सुमारास चोरी केली .या वेटरची ओळख पटली आहे हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email