वृद्ध इसमाचे पेन्शनचे पैसे घेऊन दुकली पसार

(श्रीराम कांदु)
कल्याण :आपल्या पेन्शनची 45 हजारांची रोकड बँकेतून काढून घराकडे परतत असताना एक 71 वर्षीय वयोवृद्ध इसमाच्या हाताला हिसका मारत सदर रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे .
कल्याण पुर्वेकडील कोळशेवाडी शिवराम पाटिल वाडी सुनील गायकवाड चाळीत राहणारे भास्कर गावडे 71 हे निवृत्त इसम काल सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास बँकेत पेन्शन चे पैसे काढण्यासाठी कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक परिसरातील बँकेत गेले होते .काही वेळाने ते बँकेतून पैसे काढून परतत असताना झुंझारवार मार्केट मध्ये प्रवेश करत असताना दोन अनोळखी इसमानी त्यांना हटकले त्यांच्या हातातील 40 हजार रुपये रोकड असलेली पिशवी हिसकावून पळ काढला .या प्रकरणी गावडे यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञाात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email