वृक्षारोपणाने पत्रकार विट्ठल ममताबादे यांचा वाढदिवस साजरा.

उरण दि.१७ – उरण मधील पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा 17/5/2019 रोजी वाढदिवस असल्याने आपला वाढदिवस त्यांनी उरण तालुक्यातील सारडे गावात कोमनादेवी डोंगर परिसरात निसर्गाच्या सहवासात वृक्षारोपण करून साजरा केला. सर्वसामान्य कुटुंबातील विठ्ठल ममताबादे हे स्वच्छ चारित्र्यवान, निर्व्यसनी, उच्च शिक्षित, सुसंस्कृत, दांडगा जनसंपर्क असलेले, जनतेमध्ये, समाजामध्ये मिळून मिसळून वागनारे, लोकांच्या अड़ी अडचणीला धावून जाणारे, विविध समस्यांना विविध वृत्तपत्रातुन वाचा फोडनारे,गोर गरीबांच्या दुखाची जाणीव असणारे,साधे सरळ, शांत स्वभावाचे पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. विठ्ठल ममताबादे हे नवी मुंबई मधील सेक्टर 10 वाशी येथील प्रसिद्ध फोर्टिस हॉस्पिटल(हीरानंदानी हॉस्पिटल)मध्ये क्लार्कचे काम करतात व उरलेल्या वेळेत एक आवड, एक छंद आणि सामाजिक काम म्हणून पत्रकारचे काम करतात

गेल्यावेळी त्यांनी आपला वाढदिवस उरण मधील बेलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 17 बहुजन,वंचित समाजातील, शिक्षणाच्या  मुळ प्रवाहापासून लाखो कोस दूर असलेल्या आदिवासी  विद्यार्थ्यांच्या 1 वर्षाचे शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी उचललि होती. जिल्हा परिषद शाळा बेलवाडी-उरण या शाळेतील 17 विद्यार्थ्यांचा 1 वर्षाचा त्यांना लागना-या वही पेन, कंपासपेटी आदि शैक्षणिक साहीत्याचा खर्च विठ्ठल ममताबादे यांनी केला होता यावर्षी मात्र सारडे गावात कोमनादेवी डोंगर परिसरात पर्यावरण संरक्षणाचा झाडे लावा झाडे जगवा चा संदेश देत वृक्षारोपण करून त्यांनी सारडे विकास मंचला 20 झाडे भेट म्हणून दिली.यावेळी सारडे विकास मंच या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, सुयश क्लासेस आवरेचे शिक्षक निवास गावंड,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा कराटेपटु गोपाळ म्हात्रे, सुभाष पाटिल आदि मान्यवर उपस्थित होते. आपल्या वाढदिवसातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून विविध सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते, मित्र परिवार यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email