वीजबिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरु

महावितरणचे ग्राहकांना चालू तसेच थकीत बिल भरण्याचे आवाहन

भांडुप -चालू तसेच थकीत वीजबिलाचा भरणा ग्राहकांना करता यावा याकरता म्हणून महावितरणची भांडुप नागरी परिमंडळातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे दि.२९ व ३० रोजी सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत.

महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत असलेल्या मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील सुमारे १९५ हून अधिक वीज बिल भरणा केंद्रांचा यामध्ये समावेश राहणार आहे. महावितरणमार्फत वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी मोहीम’ सूर आहे. वीज बिलांचा भरणा न केल्यास थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची धडक कारवाही केली जात आहे. त्यामुळे थकीत देयाकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे याकरीता गुरुवार(दि.२९) व शुक्रवार(दि.३०) रोजी सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरी महावितरणच्या ठाणे सर्कल अंतर्गत येणाऱ्या गडकरी, किसान नगर, कोपरी, पॉवर हाउस, विकास , कळवा, शिळ, मुंब्रा, वागळे इस्टेट, कोलशेत, लोकमान्य नगर, मुलुंड, नीलम नगर, पाच रस्ता, सर्वोदय, भांडुप, पन्नालाल, ईश्वर नगर या उप-विभागातील तसेच वाशी सर्कल अंतर्गत येणाऱ्या वाशी, एरोली, कोपर खैरणे, नेरूळ पामबीच, सी.बी.डी. बेलापूर, पनवेल, भिंगरी, कळंबोली, उरण खारगर या उपविभागातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

ऑनलाईन सेवा

याशिवाय चालू व थकीत वीजबिल भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणची वेबसाईट www.mahadiscom.in यावर तसेच मोबाईल अपच्या माध्यमातून ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरू शकतात. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यातील थकबाकीचा त्वरित भरणा करावा असे आवाहन भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email