विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे अंबेजोगाई येथे भूमिपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज बीड जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे अंबेजोगाई येथे भूमिपूजन केले. मंत्री पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, खासदार रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते. या महामार्गांची एकूण लांबी 521.75 कि.मी इतकी असून एकूण किंमत 3393.38 कोटी रूपये इतकी आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला पीकविमा योजनेतून सर्वाधिक 700 कोटी रूपये मिळाले असल्याचे सांगत आणखी 400 कोटी रूपये शेतकर्यांना मिळणार असल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्र ओडीएफ करण्यासाठी सर्वांनी दिलेले मौलिक योगदान आणि अन्य विकासाच्या विषयांवर त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
Please follow and like us: