विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ; 6 एप्रिलला मतदान

मुंबई-  धुळे, वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध बारा पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 6 एप्रिलला मतदान तर 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 17 ते 22 मार्च 2018 या कालावधीत स्वीकारली जातील. 18 मार्च 2018 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.

जिल्हा परिषद- पोटनिवडणूक होणारे निवडणूक विभाग: 22-चिमठाणे (ता. शिंदखेडा, जि. धुळे), 19-हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा) आणि 30-आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद).

 

पंचायत समिती- पोटनिवडणूक होणारे निर्वाचक गण: 61- पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), 87-नगाव (ता. जि. धुळे), 71-साक्री (ता. साक्री, जि. धुळे), 77-तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), 60-संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), 66-सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड), 83-मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड), 77-काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद), 78-सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया), 92-आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा), 64-घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर) आणि 22-मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली).

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
• नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 17 ते 22 मार्च 2018
• नामनिर्देशनपत्रांची छाननी- 23 मार्च 2018
• अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 28 मार्च 2018
• अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 02 एप्रिल 2018
• मतदानाचा दिनांक- 06 एप्रिल 2018
• मतमोजणीचा दिनांक- 07 एप्रिल 2018

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email