विवाह नोंदणीसाठी हेलपाटे मारण्याचे प्रकार थांबवा – शिवसेनेची मागणी
डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रत्येक प्रभाग क्षेत्रात विवाह नोंदणीसाठी येणाऱ्या तरुण – तरुणींना चार पाच वेळा हेलपाटे मारावे लागतात विवाह नोंदणी व्यवस्था नागरी सुविधा केंद्रात करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने आयुक्त गोविद बोडके यांना पत्र पाठवून केली आहे.
कल्याण शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिवसेना शहर शाखेत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून विवाह नोंदणीसाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत गरज नसताना चार पाच वेळा बोलावलं जाते यामुळे आर्थिक नुकसान होते शिवाय विनाकारण वेळी जातो यामुळे तरुणांमध्ये महापालिकेबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली आहे शनिवार व रविवार या दिवशी कर संकलन केले जाते त्या प्रमाणे विवाह नोंदणी करावी अशी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या मागणीचा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
Please follow and like us: