विमानतळावर सोन्याची तस्करी करणा-या, महिलेला अटक

पुणे:पुणे, विमानतळावर सोन्याची तस्करी पकडण्यात आलीय. जवळपास एक कोटी रूपयांचे सोनं तस्करी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आलयं. जप्त केलेल्या सोन्याची भारतीय बाजारातील किंमत ९८ लाख ८३ हजार ऐवढी आहे.

विमानतळावरील पोलिसांना एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे तिची कसून चौकशी केली तिच्याकडे तस्करीचं सोनं असल्याचे धक्कादायक गोष्ट पुढे आली. या महिलेचं नाव फैजान अहमद खान असं आहे.सिंथेटीक रबरची पेस्ट असलेल्या पिशव्या अंगावर गुंडाळून त्याच्या माध्यमातून महिला सोन्याची तस्करी करत होती. जप्त केलेल्या सोन्याची भारतीय बाजारातील किंमत ९८ लाख ८३ हजार ऐवढी आहे. आरोपी महिला मुंबईतील कुर्ला परिसारातील रहिवासी आहे.गुरुवारी पहाटे अबुधाबीवरून जेट एअरवेजच्या विमानाने ती पुण्याला आली होती.याप्रकरणी अधिक तपास सुरू केली आहे. पोलिसांनी फैजान अहमद खान या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email