विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखू बेकायदा वाहतूक करणाऱ्यांना कासा पोलिसांनी केली अटक
राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारमधून विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखू बेकायदा वाहतूक करणाऱ्यांना कासा पोलिसांनी अटक केली. सुगंधी तंबाखूची बेकायदा वाहतूक करण्यात येत असून ते गुजरातवरून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चारोटी टोलनाक्याजवळ सापळा रचला. संशयित कार घटनास्थळी आल्यानंतर पोलीस पथकाने मुद्देमालासह जप्त केली. या कारवाईत ८२ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी ‘लोकसत्ता पालघर’शी बोलताना दिली.
Please follow and like us: