विमल कपूर यांच्या सेवानिवृत्तिनिमित्त विषेश कार्यक्रमाचे आयोजन
टिकीट चेकिंग स्टाफ वेलफेयर एसोसिएशन मुंबई मंडळ कल्याण शाखाद्वारे मध्य रेल्वेत कार्यरत मुख्य टिकीट निरीक्षक विमल कपूर यांच्या सेवानिवृत्तिनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन शनिवार 31 मार्चला सकाळी 9:30 वाजता करण्यात आले आहे.सदर सन्मान समारंभात मध्य रेल्वेच्या आपल्या ड्यूटीदरम्यान विशेष साहस दाखणा-या व अनोखी कामगिरी करणा-या टिकीट निरीक्षकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.कल्याण रेलवे स्टेशनच्या मुख्य टिकट निरीक्षक कार्यालय येथे होणा-या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कर्मचा-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्टाफ वेलफेयर एसोसिएशन कल्याणचे अध्यक्ष अनिल कुमार गर्ग महासचिव वी वी रमन व कोषाध्यक्ष एस के शर्मा यांनी केले आहे.
Please follow and like us: